राजीव कपूर यांचे निधन, भाऊ रणधीर कपूरने लिहिली भावनिक पोस्ट!

वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0

मुंबई : गेल्यावर्षी ३० एप्रिल २०२० रोजी अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले, त्याच्या काही महिन्यात त्यांचा धाकटा भाऊ आणि अभिनेते राजीव कपूर यांचे निधन झाल्याने, कपूर परिवाराला दु:खाचा डोंगरे कोसळला. राजीव यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी (दि.९) त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेत्री नीतू कपूर यांनी याबाबतची सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत माहिती दिली. 

मंगळवारी सकाळच्या सुमारास राजीव कपूर यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच खालावली. त्यांना तातडीन चेंबूरमधील इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. दरम्यान, राजीव यांच्या निधनाने संपूर्ण कपूर परिवाराला धक्का बसला. राजीव यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी खूपच भावूक पोस्ट लिहिली. ‘मी माझा धाकटा भाऊ आज गमावला आहे. आता तो या जगात नाही. डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्राण वाचवता आले नाहीत. मी आता रुग्णालयात आहे आणि त्याचे शव मिळण्याची वाट पाहतोय, अशी भावनिक पोस्ट रणधीर कपूर यांनी शेअर केली.

तर रणधीर यांच्या पोस्टनंतर नीतू कपूर यांनीदेखील राजीव कपूर यांचा फोटो शेअर करीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान राजीव कपूर यांनी राज कपूर दिग्दर्शित ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वास पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले होते. ‘एक जान हैं हम’, ‘राम तेली गंगा मैली’, ‘आसमान’, ‘लवर बॉय’, ‘जबरदस्त’, ‘हम तो चले परदेस’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.