पुणे बंगळूर महामार्गावरील भीषण अपघातात चौघांचा मृत्यू; एकाची प्रकृती नाजूक!

0

सातारा : पुणे बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अफगाताच चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव (ता. कराड) गावाच्यया हद्दीतून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूरहून पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून एमएच ०७ – एबी ५६१० या क्रमांकाची कार अतिशय वेगाने पुण्याकडे जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही कार कराड तालुक््यातील वहागांव गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लेनवरील अज्ञात वाहनांवर जोरदार आदळल्याने, कारचा जागीच चुरा झाला. तर त्यामधील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. याशिवाय आणखी एकजण गंभीर जखमी झाला असून, त्यांची प्रकृतीही खूपच गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, घटनास्थळी खूपच विदारक दृश्य होते. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. कार एवढी वेगात होती की, अपघातानंतर कारमधील पाच जणांपैकी एकाला बाहेर पडता आलं नाही. पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.