BIG B ची नात आराध्याचा डान्स बघितला काय?, होतोय तुफान व्हायरल!

0

मुंबई  : बिग बी अर्थात महानायक अमिताभ बच्चन यांची लाडकी नात आराध्या बच्चन सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे. तिने एका लग्नात आई ऐश्वर्या सोबत धरलेला ठेका सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. खरं तर आराध्या सोशल मीडियावर नेहमीच चेर्चेत असते. तिचे फोटो, व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. मात्र यावेळी तिचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती आई ऐवर्श्या बच्चन आणि वडील अभिषेक बच्चन यांच्यासोबत चक्क डान्स करताना दिसून येत आहे.

नुकतीच आराध्या आई ऐश्वर्या आणि वडील अभिषेक यांच्यासोबत फॅमिलीतील एका लग्नासाठी उपस्थित होती. ऐश्वर्याचा चुलत भाऊ श्लोक शेट्टीचा हा लग्न समारंभ होता. समारंभात सर्वांच्याच नजरा आराध्यावर टिकून होत्या. त्याचवेळी समारंभात देसी गर्ल या गाण्यावर बच्च कुटुंब ठेका धरताना दिसून आले. त्यात आराध्यानेही ताल धरला.  आरोध्याला डान्स करताना बघून सर्वच आश्चर्यचकीत झाले. तसेच तिचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आला.

९ वर्षीय आराध्यक्षाचा डान्स सध्या तिच्या चाहत्यांना तुफान आवडत आहे. या व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट्स आणि लाईक येत आहेत. ऐश्वर्या राय आपल्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. आणि नेहमीच चाह्त्यांसोबत  फोटो शेअर करत असते. ऐश्वर्याने या लग्न समारंभातले फोटो सुद्धा शेअर केले आहेत. सोबत हेसुद्धा नमूद केलं आहे की अभिषेक या सोहळ्याला फक्त एकच दिवस उपस्थित राहू शकला होता. त्यामुळे तो फोटोमध्ये नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.