दिल्ली, पंजाबनंतर आता ‘आप’ने मुंबई महापालिकेकडे वळविला मोर्चा; सर्व जागा लढविण्याची केली घोषणा!

‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी…’ असे घोषवाक्य आपने दिले आहे

0

लोकराष्ट्र ऑनलाइन डेस्क

मुंबई : दिल्लीनंतर पंजाबमध्येही एकहाती सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाने आता विस्तारवादी धोरण आणखी गतिमान केले आहे. त्यासाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपने जोरदार मुंसडी मारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या राज्यातील जवळपास सर्वच महापालिकांच्या निवडणुका येत्या वर्षभरात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपसह महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. मात्र यासर्व घडामोडीत आपही आघाडीवर आहे.

नुकतेच आपने मुंबई महापालिका निवडणुकीच्या सर्व जागा लढविण्याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली असून, दिल्ली, पंजाबच्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबई महापालिकेतही आम आदमी पक्ष इतिहास रचणार काय? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

मुंबई मनपाचा कार्यकाळ संपला आहे पण, निवडणूक जाहीर झालेली नाही. आम आदमीने उमेदवार निवडीला सुरुवात केली आहे. सोशल मीडियातून प्रचारही सुरू केला आहे. प्रचारात दिल्लीत केलेल्या विकासाचा उल्लेख आहे. महापालिकेच्या सर्व २३६ जागा लढवण्याची आपची तयारी आहे, असे संकेत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात झाली आहे, अशी माहिती आपचे मुंबई सचिव संदीप मेहता यांनी दिली. ‘दिल्ली बदली अब मुंबई की बारी…’ असे घोषवाक्य आपने दिले आहे. मुबंईत आपचे किमान ३६ नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास आपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.