Viral : शौचालयात बिबट्यासोबत अडकला कुत्रा, तरीही जीवंत आला बाहेर, वाचा नक्की काय घडले!

0

हल्ली जंगली प्राणी शहरात येण्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. त्यातही बिबटे मानवी वस्तीत आल्याच्या बातम्या नेमहीच कानावर पडतात. कुत्र्यांची शिकार करण्यासाठी बिबटे शहरात येतात. बऱ्याच कुत्र्यांनी त्यांनी फस्त केल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोरआले आहेत. मात्र एक घटना अशी समोर आली, ज्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. होय, एकाच शौचालयात कुत्रा आणि बिबट्या अडकल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, बिबट्याने नक्कीच कुत्र्यावर ताव मारला असेल. मात्र कुत्रा चक्क या शौचालयातून जीवंत बाहेर आला आहे. कित्येक तास दोघेही एकाच शौचालयात राहूनही कुत्रा जीवंत बाहेर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भारतीय वनखात्याचे अधिकारी परवीन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिबट्या आणि कुत्रा एकाच शौचालयात काही अंतरावर बसलेले दिसत आहेत. कर्नाटकमधील एका गावात ही घटना घडली आहे. त्याचे झाले असे की, गावात बिबट्या शिरल्यानंतर बिबट्यापासून वाचण्यासाठी कुत्रा शौचालयात शिरला. मात्र बिबट्यादेखील त्याच्याच मागे शौचालयात शिरला. शौचालयातून बिबट्याला बाहेर पडता येणार नाही, म्हणून लोकांनी शौचालयाचे सर्व मार्ग बंद केले. मात्र कुत्र्याची चांगलीच पंचाईत झाली. दोघेही शौचालयात असल्याने कुत्र्याचा फडसा पाडला जाईल अशी भिती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र घडले वेगळेच.

परवीन यांनी शेअर केलेल्या फोटोत बिबट्याला घाबरलेला कुत्रा एक कोपऱ्यात शांत बसलेला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे दुसऱ्या बाजुच्या कोपऱ्यात बिबट्याही शांत बसलेला आहे. हा फोटो शेअर करताना परवीन यांनी म्हटले की, ‘शौचालयात कित्येक तासांसाठी अडकलेला हा कुत्रा जीवंत बाहेर पडला, हे फक्त भारतातच होतं.’ परवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत असताना एका घरातील शौचालयात शिरला. यानंतर घरातील लोकांनी बाहेरुन दरवाजा लावून घेतला. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कबाडा गावात हा प्रकार घडला आहे’. नंतर वनविभागाने दोघांचीही सुटका केली. परवीन यांचं ट्विट व्हायरल झालं आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.