सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची ८४ वी  वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

0

नाशिक : सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची ८४ वी  वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संपन्न झाली. सर्व विषयांना मंजुरी देत सभा डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे पार पडली. संस्थेचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर PVSM, AVSM, VSM  (सेवानिवृत्त) यांचे मोती बिंदुचे  ऑपरेशन झाल्या मुळे  उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या विनंतीनुसार संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सभा  संपन्न झाली. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश भिडे, सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे नाशिक विभाग अध्यक्ष कॅप्टन डॉ. श्रीपाद नरवणे (सेवानिवृत्त),  कार्यवाह हेमंत देशपांडे हे उपस्थित होते.

सुरुवातीला नुकतेच निधन झालेले  संस्थेचे माजी अध्यक्ष एन एम नारायणराव तथा आप्पासाहेब घटाटे तसेच वर्षभरात भारतीय सैन्य  दलातील शहीद झालेले सैनिक, माजी सैन्य अधिकारी यांच्यासह संस्थेच्या परिवार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील निधन पावलेल्या मान्यवरांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

संस्थेचे सरकार्यवाह डॉ.दिलीप बेलगावकर यांनी इतिवृत्त सादर केले व सभेचे संचालन केले. या इतिवृत्तास सभासदांनी मंजुरी दिली. या नंतर संस्थेचे  नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे यांनी सन २०१९-२० या वर्षाचा नाशिक व नागपूर विभागाचा अहवाल सादर केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपूर, मुंबई, पुणे आणि मराठवाड्यातील अनेक सदस्य पूर्वपरवानगीने उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद सभेत घेण्यात आली. या नंतर संस्थेचे खजिनदार मनोहर नेवे यांनी सन २०१९-२० यवर्षाचा लेखापरीक्षण अहवाल केला.तसेच २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या  अंदाज पत्रक यास सभेची  मान्यता घेतली. कोषायध्यक्षांनी  कोरोना  प्रादुर्भावामुळे संस्थेवर झालेल्या आर्थिक परिणामांचा  आढावा सभेसमोर ठेवला. सभेत २०२२ साली डॉ. मुंजे यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने करावयाच्या कार्यक्रमावर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रम निश्चितीसाठी गठीत केलेल्या समितीला मान्यता देण्यात आली. तसेच भोसला सैनिकी शाळा व सैनिकी शिक्षणाच्या विस्तारासाठी करावयाच्या प्रयत्नांसाठी एका समितीचे गठन करण्यात आले.

सभेसमोर त्याची मान्यता घेण्यात आली. सभेच्या शेवटी बाहेरगावाहून येऊन संस्थेच्या कार्याला हातभार लावणाऱ्या सभासदांचा विशेष उल्लेख करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी संस्थेच्या होत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. मुंजे यांचा राष्ट्रीय भावना आणि देशप्रेम या माध्यमातून सैनिकी शिक्षणाचा प्रसार व विस्तार करण्यासाठी सर्व सभासदांनी अधिक वेळ देऊन सहकार्य करावे व संस्थेला समृद्ध करावे असा विचार मांडला. सामूदायिक राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.  सभेसाठी एकूण ५० सदस्य उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.