कुत्र्यांवर बलात्कार करणाऱ्या ६८ वर्षीय वृद्धाला अटक, मुंबईतील घृणास्पद प्रकार!

0

मुंबई : अनेक पाळीव तसेच भटक्या मादी कुत्र्यांवर बलात्कार करणाऱ्या ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. डीएन नगररच्या पोलिसांनी ही कारवाई केली असून, सदर घटना डिसेंबर २०२० ची आहे. ज्याचा पोलिसांकडून नुकताच खुलासा करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार ६८ वर्षीय अहमद शाह या वयोवृद्धाने आतापर्यंत अनेक पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांना आपल्या वासनेला बळी पाडले आहे. त्याच्यावर बॉम्बे ॲनिमल राईट्‌स या संस्थेच्या विजय मोहन मोहनानी यांच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अहमद शाहने आतापर्यंत अनेक मुक्या प्राण्यांवर बलात्कार केला आहे. विजय मोहन यांनी दिलेल्या तक्रारीनंतर एका व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, संबंधित वृद्धाला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकारणाचा उलगडा होताच सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी आरोपी वृद्धाच्या कृत्याचा निषेध केला आहे. तर प्राणी प्रेमींना त्याला शिक्षेची मागणीही केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अहमद शाह हा एक भाजी विक्रेता असून, तो जुहू गल्लीत राहतो. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. एका स्थानिक व्यक्तीने विजय मोहनानी यांना अहमद शहाच्या या घृणास्पद कृत्याची माहिती दिली होती. आरोपी शाह हा परिसरातील भटक्या कुत्र्यांसोबत हे असं कृत्य करत असल्याचं संबंधित व्यक्तीनं सांगितलं होतं. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याला समजही दिला होता. पण आरोपींने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केलं.

पोलिसांच्या मते, आरोपीला अशा प्रकारची दुष्कर्म करण्याची सवय लागली होती. त्याला स्थानिक लोकांनी अनेकदा समज दिली होती. पण त्याने आपलं कृत्य थांबवलं नाही. त्यानंतर मोहनानी यांनी दिलेली तक्रार आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी वृद्धाला अटक केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.