Corona Update : नाशिक जिल्ह्यात ६७५ नवे रुग्ण, शहरात ४५० रुग्णांची भर

0

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. सोमवारी जिल्ह्यात तब्बल ६७५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये ४५० रुग्ण शहरातील आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लादल्याने, शहरातील वाढती संख्या नियंत्रणात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या जिल्ह्यात ४ हजार २२६ रुग्ण उपचार घेत आहेत. तर सोमवारी ३८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सोमवारी तब्बल ६ रुग्णांची मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिककरांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असून, पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या अशी…

नाशिक मनपा – ४५०

नाशिक ग्रामीण – १३७

मालेगाव मनपा – ७२

जिल्हा बाह्य – १६

नाशिक जिल्ह्यात सोमवारी मृत्यू

नाशिक मनपा – ४

मालेगाव मनपा – ०

नाशिक ग्रामीण – २

जिल्हा बाह्य – २

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.