Corona Update : सावधान, कोरोना रुग्ण वाढताहेत, रविवारी रुग्णसंख्येत झाली मोठी वाढ!

लोकांनी काळजी घेणे आणि शासनाच्या नियमांचे पालन करणे सर्वात महत्त्वाचे आहे

0

लोकराष्ट्र : जवळपास सर्वच निर्बंध शिथिल केल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, पुन्हा एकदचा चितेंचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. रविवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही काळातील ही सर्वात मोठी संख्या असल्याचे बोलले जात आहे. तर १ हजार ३५५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे ट्विट केले असून, त्यांनीच याबाबतची माहिती दिली. दरम्यान, कोरोना सपला या अविरभावात लोक वावरत असल्याने, पुन्हा एकदा कोरोना हात पाय पसरायला लागला आहे. राज्यात आतापर्यंत १९ लाख ७५ हजार ६०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के इतके आहे. राज्यात सद्यस्थितीत ३५ हजार ९६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.