नाशिक जिल्ह्यात ३८ हजार २२८ नव मतदार

अडीच महिन्यांत निवडणूक शाखेकडे ५६ हजार १४२ मतदारांनी अर्ज सादर केले

0

नाशिक : विशेष प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम असतानाही जिल्ह्यात मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभतो आहे. गेल्या अडीच महिन्यांत निवडणूक शाखेकडे ५६ हजार १४२ मतदारांनी अर्ज सादर केले आहेत. या अर्जांमध्ये ३८,२२८ इतक्या नवमतदारांच्या अर्जांचा समावेश आहे.

राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अधिकार स्वत:कडे घेतले असून, तसा कायदाच केला आहे. परिणामी, नाशिकसह राज्यातील १५ महापालिका, २५ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्‍या २८४ पंचायत समित्या तसेच २०८ नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. या निवडणुका तब्बल सहा महिने लांबणीवर पडतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. परंतु, निवडणुकांबाबत अनिश्चितता कायम असताना नागरिकांकडून मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभतो आहे.

जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतून मागील अडीच महिन्यांत २६ हजार १४२ मतदारांनी निवडणूक शाखेकडे अर्ज केले आहेत. या अर्जांमध्ये नवमतदारांसोबत नाव व पत्त्यामध्ये दुरुस्ती, मृत, एका ठिकाणाहून दुसरीकडे वास्तव्यास गेलेल्या मतदारांचा समावेश आहे. निवडणूक शाखेकडून संबंधित अर्जांची पडताळणी करून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ते अपडेट केले जात आहेत.

निवडणूक शाखेकडे प्राप्त अर्ज

नवमतदार………..३८२२८
नाव वगळणे………..७८६५
नाव, पत्ता दुरुस्ती……५८८१
स्थलांतरित…………४१६८
एकूण…………….५६१४२

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.