नाशिक शहरात जूनपर्यंत साकारणार ३० सीएनजी पेट्रोल पंप – पालकमंत्री छगन भुजबळ

0
नाशिक : नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सुरु असलेल्या सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईप लाईन व प्रकल्पाबाबत आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील कार्यालयात प्रकल्पबाबत आढावा घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली. 
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव, अभियंता आदित्य रामदासी आदी उपस्थित होते.
नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सुरु असलेल्या सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईप लाईन व प्रकल्पाचे काम सुरु असून जून २०२१ पर्यंत नाशिक शहरात ३० सीएनजी स्टेशनची निर्मिती पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील आतापर्यंत २५ हजार ग्राहकांनी पीएनजी घरगुती गॅस जोडणी बाबत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास २० हजार घरांतील गॅस पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी नाशिक शहरात हायप्रेशर, मिडीयम प्रेशर व लो प्रेशर पाईप लाईनचे काम प्रगतीपथावर असून लवरकरच नागरिकांना घरगुती गॅस उपलब्ध होणार आहे. तसेच सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून शहरातील फोर व्हीलर वाहने तसेच बसेसला गॅस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी देखील गॅस उपलब्ध होणार आहे.
या सर्व प्रकल्पाच्या कामकाजाची मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव, अभियंता आदित्य रामदासी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून नागरिकांना गॅसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहे.
Attachments area

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.