आज ‘आयपीएल’ लिलाव ; २९२ खेळाडू रिंगणात, विदेशी खेळाडूंवर सर्वाधिक लक्ष

चेन्नईत पार पडणार लिलाव प्रक्रिया

0

इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया आज पार पडणार आहे. चेन्नई येथे होणाऱ्या या लिलाव प्रक्रियेत २९२ खेळाडू रिंगणार असणार आहेत. यापैकी कोणत्या भाग्यवान ६१ खेळाडूंना संघमालकांकडून पसंती दर्शविली जाणार आहे, हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात सर्वाधिकऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंवर लक्ष लागणार आहे, सर्वोत्तम बोलीक कोणत्या खेळाडूवर लावली जाणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे. 

आयपीएलच्या १४ व्या हंगामाबाबत तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदाचे आयपीएल सामने देशातच खेळविले जाण्याची शक्यता आहे. यावेळी १६४ भारतीय, १२५ परदेशी आणि तीन संलग्न देशांतील खेळाडू लिलावात सहभागी होणार आहेत. संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या १३व्या हंगामात मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळवले होते. पुढील वर्षी १० संघ सहभागी होणार असल्याने यंदा मात्र छोटय़ा स्वरूपाच्या लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१९ च्या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना चांगला भाव मिळाला होता. त्यामध्ये पॅट कमिन्स, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच या खेळाडूंना सर्वाधिक बोली लागली होती. परंतु ते आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले. त्याशिवाय स्टिव्ह स्मिथची राजस्थान रॉयल्स संघातून हकालपट्टी करण्यात आल्याने यंदा मॅक्सवेलसह, स्मिथ, फिंच या खेळाडूंना कोणता संघ संधी देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

त्याशिवाय इंग्लंडचा धडेकाबाज फलंदाज डेव्हिड मलान, मोईन अली यांनादेखील मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. भारताच्या हरभजन सिंग, केदार जाधव या दोघांनाच २ कोटींची आधारभूत किंमत देण्यात आली असून खेळाडूंना ५० लाख ते २ कोटींपर्यंतच्या आधारभूत किंमतीमध्ये विभागण्यात आले आहे. त्याशिवाय सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत छाप पाडणारे मोहम्मद अझरुद्दीन, आर. साईकिशोर, विष्णू सोलंकी यांनासुद्धा संघमालकांची पसंती मिळू शकते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.