धुळे न्यायालयाच्या आवारातच आढळले २० ते २५ मृत कावळे, सर्वत्र खळबळ!

दोन कुत्र्यांनी खाल्ले मृत कावळ्यांचे मांस

0
धुळे : येथील न्यायालयाच्या आवारात २० ते २५ मृत कावळे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या कावळयांना महानगरपालिकेच्या माध्यमातुन पशू संवर्धन विभागाकडे पाठवण्यात आले असून या विभागाने त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत रवाना केले आहे. दरम्यान दोन कुत्र्यांनी मृत कावळे खाल्ल्याने त्यांच्यावर देखिल मनपा प्रशासनाने लक्ष ठेवले आहे.
धुळे तालुक्यातील मेहेरगाव परीसरातील दोन फार्ममधे कोंबडयांना बर्ड पल्युची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीने हालचाली करुन बाधीत कोंबडया शास्त्रोक्त पध्दतीने नष्ट केल्या आहेत. या घटनेच्या पाठोपाठ आज धुळे न्यायालयाच्या आवारात काही कावळे मृत झाल्याचे ॲड कुंदन पवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही माहीती महानगरपालिकेला कळवल्याने मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने मयत कावळयांना एकत्र केले. यावेळी २० ते २५ कावळे आढळून आले असून दोन कावळयांचे मास कुत्र्यांनी काल्याचे दिसून आले.
न्यायालयाच्या आवारात दोन कुत्रे पेंगलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनीच कावळयांचे मांस खाल्याचा अंदाज असुन त्यांच्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवले आहे. दरम्यान मयत कावळयांचे अवशेष पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने पुणे येथील प्रयोगशाळेत रवाना करण्यात आले आहेत. या कावळयांच्या अवशेषांच्या अहवालात संशय आल्यास बर्ड पल्युच्या तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.