जळगाव जिल्ह्याच्या वार्षिक नियोजनासाठी १०० कोटी वाढवले – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी 300 कोटी 72 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर होता. त्यात 100 कोटी रुपयांचा निधी वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी 400 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. धुळ्याला एमआरआय मशीनसाठी विशेष निधी

धुळे जिल्ह्यासाठी 147 कोटी रुपयांच्या मर्यादेत 63 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली व 210 कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला. याशिवाय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास एमआरआय मशीन खरेदीसाठी 20 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
नंदुरबारसाठी 130 कोटींना मान्यता देण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यासाठी 69 कोटी 57 लाख रुपयांची मर्यादा शासनाकडून घालून देण्यात आली होती. अधिक निधीची मागणी लक्षात घेऊन 60 कोटी 43 लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला व 130 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.