हाडांमधून आवाज येतो, मग या आजाराची शक्यता असू शकते, जाणून घ्या!

४० वय असलेल्या किंवा जास्त वजन असलेल्यांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

0

जॉइंट आपल्या शरीराचा असा भाग आहे, जिथे दोन किंवा त्यापेक्षा अधिक हाडे एकमेकांना मिळतात. जसे की, कंबरेच्या हाडाचे असते. इथे मांडीच्या हाडाचा वरचा भाग पेल्विसच्या सॉकेटमध्ये फिट असतो. जॉइंटमधील हाडे एक लवचिक पण मजबूत  कार्टिलेजने कव्हर असतात. त्यामुळे ही हाडे एकमेकांना न घासता मुव्ह करतात.

ऑस्टिओआर्थरायटिस जॉइंटमधील हाडांवरील कार्टिलेजचा हा थर कमजोर करते. त्यामुळे आपल्या जॉइंटचा सरफेस रफ होतो. याकारणाने जॉइंटमध्ये सूज, वेदना आणि ताण निर्माण होतो. पण ही लक्षणे प्रत्येक व्यक्तीत दिसत नाहीत.

‘आर्थरायटिस हेल्थ’ नुसार जेव्हा आस्टिओआर्थरायटिसचा विषय येतो तेव्हा याची लक्षणे व्यापक रूपाने वेगवेगळी असू शकतात. जॉइंट हलवताना किंवा मुव्हमेंट होत असताना यातून आवाज येऊ लागतो. हा हाडे एकमेकांना भिडत असल्याचा संकेत आहे. मेडिकलच्या भाषेत याला क्रेपिटस म्हणतात.

पण आर्थरायटिस कोणत्याही इतर लक्षणाशिवाय केवळ लक्षणावरून ओळखला जाऊ शकत नाही. क्रेपिटसशिवाय इतर काही लक्षणे जसे की, जॉइंटमध्ये वेदना ऑस्टिओआर्थरायटिसचं संकेत असू शकतो. जॉइंटमध्ये ताण जास्त करून सकाळच्या वेळी किंवा इनॅक्टिविटी पिरिअडनंतर ऑस्टिओआर्थरायटिसची वॉर्निंग साइन असू शकते.

या प्रभावित जॉइंटस्‌ची गतीही हळूवार होऊ शकते. ब्रिटनमध्ये आर्थरायटिसबाबत लोकांना जागरूक करणारी संस्था वर्सज आर्थरायटिजचे मत आहे की, अनेक प्रकारच्या स्थितीत एक व्यक्ती ऑस्टिओआर्थरायटिसचे शिकार होऊ शकतात. ४० पेक्षा जास्त वयय लोकांमध्ये याचा धोका अधिक असतो. त्याशिवाय महिला आणि जास्त वजन असलेल्या लोकांमध्येही याचा धोका अधिक असतो.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.