शिवसेना गाझीपूर सीमेवर, संजय राऊत यांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट!

0

नवी दिल्ली : शेती सुधारणा कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेनेकडून जाहीर समर्थन दिले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी शेतकरी आंदोलक तसेच शेतकरी नेते राकेश टीकेत यांची भेट घेतली आहे आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत येता येऊ नये याकरिता राज्याच्या सीमेवर पोलिसांकडून खिळे लावले जात आहेत. परंतु, हे खिळे जर भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनचे सैन्य भारतात घुसू शकले नसते, असा उपरोधक टोला राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री तसेच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या सुख-दुखात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. त्यांच्याच सूचनेनुसार गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. याआधी टीकेत यांच्यासोबत दुरध्वनीवरून चर्चा केली होती. परंतु, फोनवरून चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्षात भेट घेणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. एक कॉल करून जर आंदोलन मिटत असेले तर मग याकरिता उशीर का? असा सवाल त्यांनी प्रतप्रधानांना विचारला. शेतकऱ्यांना भेटण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आली नाही. परंतु कुणाला घाबरत नाही. पोलिसांनी अडवले, अटक केली तरी बेहत्तर, याची चिंता नाही असे राऊत यांनी म्हटले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.