वीर जवान सागर धनगर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

जळगाव : ‘वीर जवान सागर धनगर अमर रहे’, ‘भारत माता की जय’च्या जयघोषात वीरजवान सागर धनगर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.२) सकाळी १० वाजता त्यांच्या मुळगावी तांबोळे बुद्रुक (ता. चाळीसगाव) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवान सागर धनगर हे मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये मणिपूर येथे कार्यरत होते. रविवारी (३१ जानेवारी २०२१) सेनापती (मणिपूर) येथे त्ययांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी तांबोळे बु. येथे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या वीर जवानावर शासीकय इतमामात गावापासून जवळच असलेल्या तांबोळे टेकडी येथे मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान सागर धनगर यांचा चुलत भाऊ देवेंद्र धनगर याने भावाच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. यावेळी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, तहसीलदार अमोल मोरे, ग्रामीणचे पोलिस निरीक्षक ठेंगे, सैन्य दलातील मराठा बटालियनचे सुभेदार संपत आमले, हवालदार रोहिदास पाटील, भैय्यासाहेब पाटील व खान्देश रक्षक ग्रुपसह इतर विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थितीत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.