विरूष्काच्या लेकीचं बारसं : सोशल मीडियावर जाहीर केले नाव, वाचा सविस्तर!

बॉलिवूडमधून स्वागत

0

लोकराष्ट्र वृत्तसेवा : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना गेल्या महिन्यात कन्यारत्न झाले होते. त्यांनी आपल्या चिमुकलीचे नुकतेच बारसे केले असून, तिच्या नावाची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. विरुष्काच्या लेकीचं नाव काय असेल याची सर्वानाचच उत्सुकता होती आणि सोमवारी अनुष्काने पती आणि लेकीसोबतचा एक फोटो शेअर करीत तिचं नाव जाहीर केलं आहे.  त्यांनी आपल्या लेकीचं नाव वामिका (Vamika) ठेवलं आहे. 

दरम्यान, विराट आणि अनुष्काची पहिली भेट एका जाहिरातीच्या शुटींगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघेही जाहिरातीचे शूटींग करत होते. तत्पूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासोबत खूपच नर्व्हस झाला होता. पुढे दोघांमध्ये मैत्री झाली. भेटीगाठी वाढल्या. त्याचे रूंपातर प्रेमात झाले. त्यावेळी दोघांच्या प्रेमाची चांगलीच चर्चा रंगली होती. दोघे विवाहाच्या बंधनात केव्हा अडकणार अशी नेहमीच विचारणा केली जात होती. अखेर २०१७ साली दोघांनी इटलीत लग्न केले.

दरम्यान, अनुष्काने सोमवारी पोस्ट शेअर करताना म्हटले की, ‘आम्ही एकत्र प्रेम व कृतज्ञतेसह राहत होतो, परंतु या छोट्याशा वामिकाने आमच्या आनंदात आणखी भर टाकली. रडणं, हसणं, चिंता, आनंद या सर्व भावना आम्ही एका क्षणात अनुभवल्या. तुम्ही दाखवलेल्या प्रेम व प्रार्थना यासाठी आम्ही आभारी आहोत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.