विजय सेतूपतीचा ‘मास्टर’ सुसाट; कमार्इ वाचून बसेल धक्का

BOX Office Update

0

कोरोना काळात चित्रपटगृहात प्रसिद्ध झालेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीचा ‘मास्टर’ हा चित्रपट प्रदर्शनाचे पंधरा दिवस उलटूनही बॉक्स ऑफिसवर तुफान कमार्इ करीत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने धूमाकुळ घातला असून, चित्रपटाची जादू कायम असल्याचे पहावयास मिळत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाने चैन्नर्इमध्ये 10 कोटी रुपयांची कमार्इ केली आहे. तर तामिळनाडू येथे चित्रपटाने 115 कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. त्यामुळे राज्यात सर्वाधिक कमार्इ करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘मास्टर’ने सातव्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.

मास्टर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुफान कमाई केली होती. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपटाने ११.३ कोटी रुपयांची कमाई केली होती. तामिळनाडूमध्ये ४९ कोटी रुपये, केरळमध्ये ४.१ कोटी रुपये आणि ५ कोटी रुपये कमाई कर्नाटकमध्ये केली. इतर ठिकाणाहून जवळपास १ कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने केली होती. त्यामुळे मास्टर चित्रपटाने जवळपास ७० कोटी रुपयांची कमाई पहिल्याच आठवड्यामध्ये केली होती.

‘मास्टर’ या चित्रपटात अॅक्शनचा भरणा आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. या चित्रपटात विजय सेतुपतिसोबतच मालविका मोहनन मुख्य भूमिकेत आहे. ‘मास्टर’ चित्रपटाची लोकप्रियता पाहता कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी चित्रपटाचे हक्क खरेदी केल्याचे समोर आले. या चित्रपटाच्या रिमेकसाठी बॉलिवूडमधील दोन कलाकारांची निवड करण्यात येणार असल्याचे म्हटले जाते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.