लावण्यवती स्पर्धेत नाशिकच्या शिरनने मारली बाजी

नाशिककरांचा उर अभिनाने भरला

0

मुंबई : आणि विजेती आहे शिरीन दत्ता पाटील… हा आवाज झी मराठीच्या रंगमंचावर घुमला आणि तमाम नाशिककरांचा ऊर अभिमानाने भरून आला. झी मराठी वाहिनीची महाराष्ट्राची लावण्यवती ही स्पर्धा  रविवारी रात्री रंगली.  या स्पर्धेत नाशिकची शिरीन विजेती तर नाशिकचीच क्षमा देशपांडे उपविजेती ठरली. अंतिम बारामध्ये शिरीन व क्षमा यांनी बाजी मारल्याने तमाम नाशिककरांचे डोळे या इव्हेंटकडे लागले होते.

दरम्यान, झी मराठीच्या महाराष्ट्राची लावण्यवती या स्पर्धेत अंतिम १२ स्पर्धकांमध्ये नाशिकच्या शिरीन दत्ता पाटील व क्षमा देशपांडे यांचा समावेश होता. महाराष्ट्राची पहिली लावण्यावती होण्यासाठी या १३ स्पर्धकांमध्ये महाअंतिम फेरी झाली. नाशिकचे दोन स्पर्धक स्पर्धेत असल्याने तमाम नाशिककरांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले होते. दरम्यान, ‘महाराष्ट्राची पहिली लावण्यावती’ चा किताब नाशिकच्या शिरीन दत्ता पाटील हिला मिळाल्याने नाशिककरांचा उर अभिमानाने भरला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.