राहुल गांधींनी घेतला मशरूम बिऱ्याणीचा आस्वाद ; व्हिडीओ व्हायरल!

व्हिडीओची सोशल मीडियावर एकच चर्चा

0

तामिळनाडू : तामिळनाडूत यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशात काँग्रेस नेते राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यातील त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये राहुल गांधी मशरूम बिऱ्याणी खाताना दिसत आहेत.

गेल्या आठवड्यात राहुल तामिळनाडू दौऱ्यावर गेले होते. त्यांनी तिथे अनेक सभा घेतल्या आणि लोकांना भेटले. युट्यूब चॅनलच्या एका शोमध्येही ते पोहोचले. याच शोमध्ये त्यांनी मशरूम बिऱ्याणीचाही आनंद लुटला. याशिवाय शोदरम्यान राहुल गांधी यांनी बिऱ्याणी तयार करणाऱ्या लोकांशी चर्चाही केली. राहुल यांचा हा संपूर्ण व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

https://youtu.be/5LHyK9zMhMM

व्हिलेज कुकिंग चॅनलद्वारा अपलोड करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी बघितलेला आहे. राहुल यांनी तामिळनाडूतील दौऱ्यात पश्चिम भागात जास्तीत जास्त सभा घेतल्या. राहुल यांचा व्हिडीओ तामिळनाडू काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटने रिट्वीट केला आहे. व्हिलेज कुकिंग चॅनलने हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे. राहुल यांनी जवळपास ४४ मिनटे या लोकांशी गप्पा केल्या. लोकांशी चर्चा झाल्यानंतर ते बिऱ्याणी खाताना दिसत आहेत. त्यानंतर राहुल यांनी जमिनीवर खाली बसून केळीच्या पानांवर बिऱ्याणीचा आनंद लुटला त्यानंतरच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.