राष्ट्रीय  छायाचित्र स्पर्ध्येत  प्रा. आनंद बोरा यांच्या छायाचित्रास द्वितीय पारितोषिक

संचुरी एशिया वाइल्डलाइफ अवॉर्ड विजते प्रा. आनंद बोरा

0

नाशिक : मुंबईच्या विख्यात वाईल्ड विजन या संस्थेतर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचनालयाच्या सहकाऱ्याने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धेत नाशिकचे वन्यजीव छायाचित्रकार व  संचुरी एशिया वाईल्डलाइफ अवार्ड विजेते   प्रा. आनंद बोरा यांच्या छायाचित्रास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक  जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचनालनाचे सह संचालक धनंजय सावलकर आणि ठाण्याच्या सहायक वन संरक्षक गिरीजा देसाई यांनी वाईल्ड लाईफ या विषयातील व्यावसायिक  गटाच्या पारितोषिकाची घोषणा केली.झूम वर झालेल्या या कार्यक्रमात हि घोषणा करण्यात आली. फेब्रुवारी मध्ये सरकारी परवानगी मिळाल्या नंतर बक्षीस समारंभ आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेचे निनाद कर्णिक, सारिका प्रभुदेसाई यांनी सांगितले. या स्पर्धेचे  परीक्षन  केदार भट आणि सागर गोसावी यांनी केले.

स्पर्धेसाठी देशभरातून आठशे प्रवेशिका आल्या होत्या.यातून प्रा.आनंद बोरा यांच्या सावरकर नगर मधील बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशन मधील छायाचित्रास हे पारितोषिक मिळाले आहे.बोरा यांना या पूर्वी   महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महा संचानालाया तर्फे आयोजित महाराष्ट्र माझा या राज्यस्तरीय स्पर्ध्येत प्रथम क्रमांक,किर्लोस्कर वसुंधरा राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक देखील मिळाले असून  आता पर्यंत ३० विविध छायाचित्र पुरस्कार मिळाले असून यामध्ये दहा राज्यस्तरीय, दोन राष्ट्रीय स्तरावरील व एक आंतराष्ट्रीय पुरस्कारांचा समावेश आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.