या पालेभाज्या खा, निरोगी राहा!

0

निरोगी आरोग्यासाठी जेवणात पालेभाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण पालेभाज्यांमुळे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत होते. शिवाय पालेभाज्या आपली रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यातही पालक या पालेभाजीचे अनेक महत्त्व आहेत. पालक पंचनसंस्था आणि मूत्रसंस्ता यांच्या आतील सूज कमी करून मऊपणा आणण्यास उपयुक्त दमा आणि खोकला कमी करणारी भाजी म्हणूनही पालकला ओळखले जाते.

मेथीचेही बरेचसे महत्त्व आहेत. सारक आणि पथ्यकर असलेल्या या भाजीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. याचे बी वातहारक व शक्तिकारक असते म्हणून बाळंतपणात याचा उपयोग केला जातो. दूधवाढीसाठीही त्याचा उपयोग होतो. मेथ्यांचे पीठ तोंडाला लावल्यास चेहर्‍यावरील सुरकुत्या नष्ट होतात व चेहरा तजेलदार दिसतो. शेवगा  ही भाजी वातनाशक आणि पित्तनाशक आहे. हृदय आणि रुधिराभिसरण क्रिया यामुळे सुधारण्यास मदत होते.

अळू   :  याच्या पानांचा आणि दांड्यांचा रस जंतुनाशक आहे. त्यामुळे शरिराच्या कापलेल्या भागावर याचा रस लावून पट्टी बांधल्यास जखम लवकर भरून येते. याचा रस साखरेबरोबर दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास मूळव्याध कमी होतो.   टाकळा : सर्वांगाला येणारी खाज ही भाजी खाल्याने कमी होते. या भाजीच्या बियांचे पीठ अशक्तपाणा कमी करण्यास मदत करते. कोथिंबीर :  उष्णता कमी करणारी, पित्तनाशक आहे. हृदरोगावर अतिशय उपयुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.