म्यानमारमध्ये लष्काराने सत्तापालट केल्याने, ड्रॅगनची उडाली झोप, पाहा फोटो!

चीनने यासर्व प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

0

चीन आणि भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये सोमवारी लष्कारानने बंड करीत सत्तापालट केले. सैन्य कमांडर इन चीफ मिन  आंग लाइंग यांच्याकडे देशाच्या सत्तेची सुत्रे आली. मात्र जनरल मिन सत्तेवर आल्याने ड्रॅगनची चांगलीच झोप उडाल्याचे दिसत आहे. त्यामुळे म्यानमारमधील सत्तापालटावर थंड प्रतिक्रिया देत चीनने सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. 

वास्तविक म्यानमारचे लष्करप्रमुख जनरल मिन यांचे चीनशी जवळचे संबंध आहेत. मात्र, ते पाकिस्तानी लष्कर प्रमुखांप्रमाणे गुलामगिरी करत नाहीत. जनरल मिन यांचे चीनचा मोठा शत्रू असलेल्या भारताशी जवळचे संबंध आहेत. यामुळेच आंग सांग सू की यांना आपल्याकडून वळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनची झोप उडाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.