मुंबई महापालिकेत निनावी ‘लेटरबॉम्ब’मुळे खळबळ!

मुंबई महापालिकेत सध्या एका निनावी पत्रामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.

0

मुंबई : सध्या मुंबई महापालिकेत लेटल बॉम्बमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये प्रशासन आणि कंत्राटदारामध्ये साटंलोटं असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच सॅप प्रणालीत हस्तक्षेप करत काही कर्मचारी कंत्राटदारांना मदत करत असल्याचे पत्रात नमुद करण्यातत आले आहे. मात्र हे पत्र कोणी लिहिले? कोणी इथपर्यंत पोहोचवले? त्यामागाचा नेमका हेतू काय? असे प्रश्न आता निर्माण झाले आहे.आता या पत्रावर मुंबई महापालिका काय कारवाई करणारे हेही बघणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. २८ जानेवारी रोजी हे पत्र महापालिकेत धडकले. तेव्हापासून एकच खळबळ निर्माण झाली असून, या पत्राचा तपास केला जात आहे. 

मनपा आयटी विभाग कर्मचारी, सॅप कंपनी कर्मचारी, कंत्राटदार यांचे रॅकेट असल्याचा आरोप पत्रातून करण्यात आलाय. निनावी पत्राद्वारे तक्रारदाराने चौकशीची मागणी केली आहे. या पत्रात तीन कंत्राटदार कंपन्यांच्या निविदा पद्धतीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ठराविक कंपन्यांना कशाप्रकारे कामं मिळत याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे. भाजपने हे पत्र गांभीर्याने घेतले असून भाजप गटनेते आयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहून याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.