मार्चमध्ये कोल्हापूर मनपा निवडणुकीचा धुराळा!

कोल्हापूर मनपा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे मार्च महिन्यात ही निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

कोल्हापूर महापालिकेच्या ८१ प्रभागासाठीचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले आहे. त्याच्यावर आलेल्या हरकतीवर सध्या सुनावणी सुरू आहे. निवडणुकीचा पुढचा टप्पा म्हणून मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १६ फेब्रुवारीला प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १२ मार्चला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्याच्या हालचाली पाहता मार्चच्या अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. सहकारी संस्थाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असतानाच आता महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात एकाचवेळी सहकारी संस्था व महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.