महिलांनी शिक्षणाबरोबर व्यवसायातही प्राविण्य मिळवावे- डॉ. शेफाली भुजबळ

जयहिंद नगर, लक्ष्मी केदार नगरी येथे हळदी कुंकू समारंभ

0
नाशिक : जेलरोड येथील जयहिंद नगर, लक्ष्मी केदार नगरी येथे हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.शेफाली भुजबळ बोलत होत्या.महिलांनी शिक्षणात प्राविण्य तर मिळवावेच पण व्यवसायात देखील आघाडीवर राहावे,स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढली पाहिजे असेही त्या म्हणाल्या* यावेळी मनपा माजी विरोधी पक्ष नेत्या कविता ताई कर्डक यांनी कर्मकांड सोडून महिलांनी विज्ञान वादी परंपरा स्वीकाराव्या असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संयोजक योगेश निसाळ यांनी या परिसरात केलेल्या कामाची माहिती उपस्थित महिलांना दिली. यावेळी उत्कृष्ट श्रुंगार करणाऱ्या अपर्णा वाव्हळ,प्रियांका निरभवने,रोहिणी जाधव या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी केले.आयोजक हेमलता जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी मेट च्या संचालिका डॉ.शेफाली ताई भुजबळ,जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी ताई भदाणे,माजी विरोधी पक्ष नेत्या कविताताई कर्डक, उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजक योगेश निसाळ, हेमलता जगताप,सिंधू फुले,माधवी निसाळ, सुरेखा निमसे,चंद्रकला साबळे,रुपाली पाठारे,संगीता साळवे,अनिता बोराडे,रोहिणी पगार,सविता जगताप,मंगला उगले,आदींनी परिश्रम घेतले. यावेळी जयहिंद नगर,लक्ष्मी केदार नगरी, द्वारका नगर,राहुल नगर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.