बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण देणार ‘गुड न्यूज’, फोटो व्हायरल!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण लवकरच चाहत्यांना गुड न्यूज देणार आहे.

0

मुंबई : बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोणनचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच या फोटोमुळे पुन्हा एकदा दीपिका गर्भवती असल्याची चर्चा रंगू लांगली आहे. खरं तर यापूर्वीदेखील अशी चर्चा रंगली होती. मात्र आताच्या फोटोत तिने दिलेले कारण या चर्चेला बळ देणारे आहे. त्यामुळे ही गुड न्यूज तर नाही ना असा सवाल तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. 

दीपिकाने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामद्ये ती तिच्या पोटाच्या दिशेने पाहत आहे. तसेच तिच्या हास्यमुद्रा त्याबाबतचे संकेत देत आहेत. हा फोटो शेअर करताने तिने कॅप्शनमध्ये केवळ फेब्रुवारी असे लिहिले आहे. त्यामुळे या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी म्हटले आहे की, दीपिका गुड न्यूज देणार आहे. तिने या फोटोतून ती आई होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले नसले तरी तिने त्याबाबतचे संकेत मात्र दिले आहेत.

सध्या तिचा हा फोटो व्हायरल होत असून, चांहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे एकमेकांना सहा वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंशी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यावर्षी दीपिकाचे एक दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.