बागलान उत्राणे गावात राष्ट्रवादीचे यश; सदस्यांचा सत्कार!

जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या हस्ते गौरव

0

नाशिक : उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करुन गावच्या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.

बागलाण तालुक्यातील उत्राणे ग्रामपंचायतीची निवडणुक नुकतीच पार पडली. यात नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्वच्या सर्व ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या आहेत. या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सपत्नीक सत्कार गावचे भूमिपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार व त्यांच्या पत्नी संध्या पगार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख दिपक पगारनवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य केदा पगारकोमल पगाररोहिदास आहिरे, आकाश पगार यांची भाषणे झाली.

निवडणुकीतील उणीदुणी काढत बसण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहावे असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यावेळी बोलतांना सांगितले.

राज्य सरकारच्या माध्यमातून असलेल्या  विविध योजना उत्राणे गावात राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवारपालकमंत्री ना.छगन भुजबळप्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटीलग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आपण सर्वत्तोपरी सहकार्य करु असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

यावेळी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य केदा पगारपुंजाराम पगार, योगिता पगार, हर्षदा पगारश्रीमती अनुसया पगार, झेलाबाई बागुलकोमल पगार, रोहिदास आहिरे आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वश्री दादाजी पगारलोटन पगारसीताराम पगारडोंगर पगारबळीराम पगारदिलीप पगारमोठाभाऊ पगारकारभारी पगारडॅा.मोहन पगारसंजय पगार, संतोष पगारप्रवीण पगारजगदीश पगारगणेश पगारअशोक पगारउत्तम भामरेशेनाजी पगारयुवराज पगारकारभारी बागुलचंद्रकांत निकमदिनकर पगारशरद पगारविनोद पगारभाऊसाहेब पगाररावसाहेब पगारनितीन पगारसाहेबराव पगार ,लोटन पगारदादाजी पगार ,सीताराम पगारसंतोष पगार, प्रवीण पगारदिलीप पगारदिनकर पगारनितीन पगारअनिल पगारभाऊसाहेब पगार, प्रशांत पगार, उत्तम भामरेरावसाहेब पगार, युवराज पगार, गणेश पगार, विरेंद्र पगारशुभम पगार, दर्शन पगार, कविता पगार, लीलाबाई पगार, संध्या पगार, शकुंतला पगार, अंजली पगार, निकिता पगार, मनीषा अहिरे, कावेरी पगार आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.