धक्कादायक : कोरोना मेंदूत लपून राहू शकतो, संशोधकांचा अंदाज!

0

वॉशिंग्टन : संपूर्ण जगात हाहाकार निर्माण करणाऱ्या कोरोना विषाणूबाबत दरदिवसाला धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता मेंदूत हा विषाणू लपून राहू शकतो अशाबाबतचा धक्कादायक निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

काही व्यक्ती कोरोना संसर्गातून बऱ्या झाल्यावरही काही दिवसांनी त्यांचा अचानक मृत्यू होतो किंवा त्या गंभीर आजारी पडतात अशी काही उदाहरणे समोर आली आहेत. अशा घटनांमागे कोरोना विषाणू मेंदूत राहिलेला असल्याचे एक कारण असू शकते, असे अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे. अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोरोना विषाणू मानवी मेंदूत राहू शकतो.

याकरिता संशोधकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका उंदराचे निरीक्षण केले असून, या उंदराला अनेक शारिरीक, मानसिक व्याधी जडल्याचे समोर आले आहे. सखोल परिक्षण केले असता, कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या पाच ते सहा दिवसानंतर कोरोनाचा विषाणू त्या उंदराच्या मेंदूत लपल्याचे समोर आले. वास्तविक त्याच्या फुफ्फुसामधील कोरोना विषाणूची संख्या झपाट्याने कमी होत होती. परंतु मेंदूतील विषाणूची संख्या शरिरातील इतर विषाणूच्या संख्येच्या हजारपटीने जास्त असल्याने, त्याच्या शरीराला इजा पोहोचण्याची तिव्रता अधिक आहे.

भारतीय वंशाचे मुख्य संशोधक मुकेश कुमार यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेकांमध्ये क्षमता नष्ट होत आहे. या लक्षणांचा फुफ्फुसांशी संबंध नाही. कोविड-१९ हा केवळ श्वसनयंत्रणेशी संबंधित विकार आहे, असे म्हणता येणार नाही. तर कोरोनामुळे मेंदूत बिघाड निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे संपूर्ण शरिरावर त्याचा परिणाम होण्याची भिती आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.