दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण : घटनास्थळी बंद पाकिट सापडल्याने उडाली एकच खळबळ

देशाची राजधानी हादरली

0

दिल्ली : देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीत अनेक घडामोडी घडत असून, शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एकदा अशाच एका घटनेने दिल्ली हादरली आहे. मध्य दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. या बॉम्बस्फोटाची तीव्रता फारच कमी असल्याने अनर्थ टळला.दरम्यान, बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून, यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या स्फोटाचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून, त्यांना घटनास्थळी एक बंद पाकिट सापडल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. या पाकिटासंदर्भात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली असून, यासंदर्भात तपास सुरू आहे.

दरम्यान, या बंद पाकिटावर इस्त्रायल दुतावासातील एका अधिकाऱ्यासंबंधी मजकूर लिहिलेला आढळला. बंद पाकिटावर इस्त्रायली दूतावासात काम करणाऱ्या अधिकाऱ्यासंबंधी मजकूर लिहलिला आहे. या बंद पाकिटाचा आणि त्यावरील मजकूराचा बॉम्बस्फोटाशी काही संबंध आहे की नाही याचा तपास दाखल झालेले पथक करत आहे. पण ते बंद पाकिट घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आले आहे, एवढे नक्की असल्याची माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना दिली.

‘बिटिंग रिटि’ सोहळ्यादरम्यान केला बॉम्बस्फोट
दरम्यान, विजय चौकापासून दोन किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित असलेल्या विजय चौकवर सैन्याचा ‘बिटिंग रिटि’ सोहळा सुरू असतानाच हा बॉम्बस्फोट घडला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दलि आहे. गृहमंत्री अमित शाह हेदेखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

मुंबर्इत हायअलर्ट
या बॉम्बस्फोटाबाबत अद्यापपर्यंत ठोस पुरावे हाती लागले नसले तरी, सुरक्षेच्या कारणास्तव मुंबर्इत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेताना सुरक्षा व्यवस्था आणखी चोख करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंबर्इतील काही महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.