टायगर श्रॉफच्या कॅसिनोवा गाण्यात झळकणार गायिका रवीना मेहता

काही दिवसांपूर्वी कॅसिनोवा हे गाणं त्याच्या  यूट्यूबवर रिलीज केले होते

0

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी कॅसिनोवा हे गाणं त्याच्या  यूट्यूबवर रिलीज केले होते आणि ह्या गाण्याला त्याच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली. नुकताच टायगर ह्या गाण्याचा ध्वनिक व्हर्जन म्हणजेच acoustic version चे टीजर त्याच्या इन्स्टाग्राम वर टाकले. ह्या गाण्यात टायगर सोबत सिंगर रवीना मेहताने  सुद्धा आपला मधुर आवाज दिला आहे. कॅसिनोवा 2 फेब्रुवारी २०२० रोजी टायगरच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज होणार आहे.

गायिका रवीना मेहताने अविस्तेश श्रीवास्तव सोबत यादे या गीतातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर लोकडाऊन मध्ये रवीना ने ऋषी रिच, राहुल जैन, रिषभ कांत यांसोबत तब्बल ४ गाणी रिलीज केली.  गायक रवीना मेहता यांना टायगर आणि तिच्या टीम सोबत काम केल्या बद्दलच्या अनुभवाविषयी विचारले असता ती म्हणाली की टायगर माझ्यासाठी प्रेरणास्थान सारखा आहे.  तो त्याच्या कलेत अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अभूतपूर्व आहे. अवितेशने श्रीवास्तवने आमची स्टुडिओमध्ये ओळख करून दिली. माझ्या साठी हे गाण्याचं शूट म्हणजे खूप  सुंदर प्रवास आहे आणि मी प्रेक्षकांसमोर हे गाणं सादर करण्यासाठी उत्सुक आहे.  चाहत्यांकडून मिळण्याऱ्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.