गुन्हेगारांसोबतचा गृहमंत्र्यांचा फोटो होतोय व्हायरल, ‘हे’ दिले स्पष्टीकरण!

औरंगाबाद दौऱ्यावर असताना तीन कुख्यात गुन्हेगारांसोबतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

0

औरंगाबाद : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा औरंगाबाद दौऱ्यातील एक फोटो सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. या फोटोत ते तीन गुन्हेगारांसोबत दिसत असून, विरोधकांनी त्यावरून राळ उठवून दिली आहे. राज्याचे गृहमंत्रीच गुन्हेगारांसोबत फोटोशेसन करीत असतील तर मग कायदा सुव्यवस्थेबाबत बोलण्याची गरजच नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्योसोबत असणाऱ्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने या फोटोवरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले असून, त्यात त्यांनी म्हटले की, ‘मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन.’ अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत.

कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्येही होता. सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून ओळख आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.