क्रेडाई राष्ट्रीय शिखर परिषद 2021 : युनिफाइड डिसीपीआर ग्राहककेंद्रीत – सतीश मगर

0

नवीनबांधकाम करताना प्लाॅट घेतलेल्या मिळकतदारांना वाढीव बांधकाम करण्याचा फायदा होणार आहे. वाढीव प्रीमियमची रक्कम महापालिकेस मिळेल. त्यामुळे महापालिकेला आर्थिक फायदा होणार आहे. तसेच विकासक आणि बिल्डरना ग्राहक मिळतील. त्यामुळे नवीन बांधकाम नियमावली (युनिफाइड डिसीपीआर) ग्राहक केंद्रीत असून, शहरविकासासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रेडाईतर्फे आयोजित राष्ट्रीय शिखर परिषदेप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सल्लागार जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, राष्ट्रीय खजिनदार अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारख, महाराष्ट्र सचिव सुनील कोतवाल, क्रेडाई नाशिक अध्यक्ष रवी महाजन उपस्थित होते. पुढे बोलताना सतीश मगर म्हणाले की, ‘चार ते पाच वर्षे विचारविनियम करून नवीन बांधकाम नियमावली प्रत्यक्षात आणली आहे. या नियमावलीमुळे शेतींवर होणारे अतिक्रमणे थांबणार आहेत. सध्या या नियमावलीची जनजागृती केली जात असून, शासनस्तरावर त्याबाबतचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबत क्रेडाई प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. रेरा, जीएसटी आल्यानंतर शासनानेच रिअल इस्टेटला उद्योगाचा दर्जा देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राजीव पारख यांनी क्रेडाईचा ५७ शहरात विस्तार असून, त्यात वणी आणि अमंळनेर या दोन ग्रोथ सेंटरचा समावेश झाला आहे. नव्या बांधकाम नियमावलीमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला चांगले दिवस आल्याचे त्यांनी सांगितले. जितूभाई ठक्कर यांनी, सामान्य माणसाला स्वस्त घरे मिळावेत हाच आमचा विचार असल्याचे सांगितले. त्यामुळे सरकारने करांमध्ये सुटसुटीतपणा कसा आणता येईल याबाबतचा विचार करणे गरजेचे आहे. अनंत राजेगावकर यांनी सिमेंट आणि स्टीलच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने धोरण आखणे गरजेचे असल्याचे सांगितले. मनमानी पद्धतीने दरांमध्ये वाढ केली जात असल्याचेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. तर सुनील कोतवाल यांनी, एखादे शहर निर्माण करतांना त्या भागातील बांधकाम व्यवसायिक फक्त घरे बांधत नाहीत, तर संपूर्ण शहरच उभारत असतो. आपल्या बांधकामातून विविध सोईसुविधा निर्माण करून एक संस्कृतीचीही पायाभरणी त्याच्याकडून होत असल्याचे ते म्हणाले.

फुडपार्क ठरतील वरदान

नाशिक भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर असून, फुडपार्क या शहराला वरदान ठरतील असे मत क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी व्यक्त केले. पुण्याजवळ असलेल्या शिरोळ येथे फुडपार्क विकसित केले आहेत. मात्र नाशिकमध्येही फुडपार्कला पोषक वातावरण असून, त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर योगासिटी म्हणून नाशिकला जाहीर करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

प्रातिनिधिक कार्यकारिणी
क्रेडाईच्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिखर परिषदेत ५७ शहरांचे अध्यक्ष या उपस्थित आहेत. त्यामुळे आगामी कार्यकारिणी निवडीच्या दृष्टीने राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर यांच्या अध्यक्षतेखाली मंथन करण्यात आले. त्यामध्ये प्रातिनिधिक कार्यकारिणी निवडीबाबतची घोषणा केली जाणार असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.