काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर, कृषी कायदे रद्द केले तर ? : छगन भुजबळ

अन्नदात्याला न्याय का नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा केंद्राला सवाल

0
शेतकरी महिनोंमहिने कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत बसले आहेत. लोक मरत आहेत परंतु पंतप्रधान ठोस निर्णय घेत नाहीयत… काय बिघडणार आहे शेतकऱ्यांना न्याय दिला तर… कृषी कायदे रद्द केले तर असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमा वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
दिल्लीच्या सीमांवर शेतकरी हे आपली बायका – पोरं घेऊन थंडी वार्‍यात…कोरोना असताना आंदोलनाला बसले आहेत. त्यांना कोण खलिस्तानी तर कोण पाकिस्तानी म्हणून हिनवल जात आहे त्यामुळे केंद्र सरकार नेमकी काय करतंय ? असा संतप्त सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे. हे कायदे शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरतील असे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
जे तुमच्या आमच्यासाठी… हा देश अन्नधान्याने दुष्काळी होता त्यावेळी या शेतकऱ्यांनी अन्नधान्य पिकवलं आणि परदेशातही एक्स्पोर्ट केलं त्या शेतकऱ्यांना दोन – चार दिवस ठिक आहे. महिनोंमहिने आंदोलन करावे लागते आहे. पंतप्रधान मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. कृषी कायदे रद्द करा… मागे घ्या… तो रिफिल करा… नवीन कायदा बनवायचा असेल तर नवीन बनवा आणि शेतकर्‍यांबरोबर चर्चा करा असा सल्लाही छगन भुजबळ यांनी दिला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.