एल्गार परिषद : प्रक्षोभक भाषण करणाऱ्या शरजील उस्मानी विरोधात गुन्हा दाखल!

स्वारगेट पोलिसांनी दाखल केला गुन्हा

0

पुणे : एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची दखल घ्यायलाच हवी, असा सुर सर्वत्र व्यक्त केला गेल्याने पुणे स्वारगेट पोलिसांनी अखेर शरजील उस्मानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल आक्षेपार्ह, अवमानजनक वक्तव्य केले होते. त्यामुळे राज सरकारने तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

त्याबाबतचे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिले होते. त्यानंतर आता शरजील उस्मानी विरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेरजीलप्रकरणी राज्यात चांगलेच राजकारण तापले असून, विरोधांकडून टीकेची झोड उठविली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.